हिंगोली येथे विभागीय स्पर्धेत विजयी
सिल्लोड, (प्रतिनिधी) : श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ तळणी संचालित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री गणेश ठोंबरेने (वयोगट १८ वर्षे) खालील गटात विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत हिंगोली येथे सहभाग नोंदवत विजय संपादन केला.
तिला आता राज्यावर होणाऱ्या स्पर्धेत संधी मिळणार आहे. सर्व सामान्य कुटुंबातील, ग्रामीण विद्यार्थ्यांना असल्या स्पर्धेत विजय मिळणे कठीण असते परंतु धनश्रीने चिकाटीने,स्वकौशल्याने खेळात सराव ठेवत आपल्या कुशाग्र बुद्धीची चुणक दाखविली.
तिच्या यशाबद्दल शैक्षणिक संस्थेचे सचिव तथा प्राचार्य अशोक गरुड, उपप्राचार्य सतीश देशमुख, ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री रायभान जाधव, मयुरेश सुसुन्दे, नरेश बलकार, श्री धनवट पालक नारायण ठोंबर गणेश ठोंबरे, जनार्दन कुंटे,जगदीश गतखणे, विद्यालयाचे प्राध्यापक, सहशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
















